Join us for the first event in our Sangeet Natak series! Don’t miss 'Pati Gele Ga Kathewadi' on Feb 15 at 6 PM. Grab your tickets now at mmbayarea.org.
Earlier, we shared our exciting plan to celebrate "Sangeet Natak" this year. Now, we’re thrilled to present the first program in this series—don’t miss it! Grab your tickets now at mmbayarea.org
संगीत नाटक 'पति गेले ग काठेवाडी - १५ फेब्रुवारी सायंकाळी ६.०० वाजता
संगीत नाटकाचे गारुड मराठी मनावर अनेक वर्ष रुंजी घालत आहे. त्याच परंपरेला पुढे नेत MSBC, Canada सहर्ष सादर करीत आहे; व्यंकटेश माडगूळकर लिखित, दोन अंकी संगीत नाटक 'पति गेले ग काठेवाडी!' या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक नाट्य संगीत आणि लोकसंगीत यांचा उत्कृष्ट मिलाफ, लोकनाट्य आणि रंगमंचीय नाटक यातील वातावरण व भाषा याचा चपखल मेळ! आणि त्या सर्वाना एकत्रितपणे घट्ट बांधणारं व्यंकटेश माडगूळकरांच्या सिद्ध लेखणीतून साकार झालेलं नर्म विनोदी पण तितकंच मार्मिक कथानक म्हणजे मनोरंजनाचा हुकुमी एक्का! नाटकाचं कथानक जरी ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बेतलेलं असलं तरी त्यातून प्रसंगी निर्माण होणारा विनोद, हसत हसत हळूच चिमटा घेऊन मांडलेले प्रश्न आजच्या काळालाही साजेसे वाटतात. माणसाचं मन किती विचित्र असतं, कसं दृश्य-अदृश्याच्या खेळात अडकतं त्याचा आपल्याला पुराणकाळापासून विविध कथांमधून प्रत्यय आला आहे. राग,लोभ, असूया, मोह यामुळे घडलेलं रामायण महाभारत तर माहितीच आहे आपल्याला! हे नाटकही त्याला अपवाद नाही पण या सगळ्या भावनिक आरश्यात आपल्याला निरपेक्ष स्वामीनिष्ठेचं, सर्वस्व ओवाळून टाकणाऱ्या हळुवार प्रेमाचं प्रतिबिंबही दिसेल! रेकॉर्डेड नाही पण प्रत्यक्ष साथसंगतीत सादर होणाऱ्या नाट्यसंगीताची मजा लुटायला तुम्हालाही नक्कीच आवडेल याची खात्री आहे आम्हाला. संगीत नाटकाचा सुवर्णकाळ तर आपल्याला कालचक्र उलटे फिरवून परत आणता येणार नाही पण त्याची छोटीशी झलक घेऊन तोच जादुई काळ पुन्हा अनुभवायला कोणाला आवडणार नाही?
Fill up this form to reach our stunning Streamed team and click on send message